पुणे : गेल्या काही वर्षांपूर्वी देशभरात कोरोना महामारीने चांगलाच हाहाकार माजवला होता. या कोरोना काळात पुणे महानगरपालिकेकडे खासगी कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून आलेला साडेसाड कोटी रुपयांचा निधी पडून असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेला मिळालेल्या या रकमेतून केवळ व्याज मिळविण्यामध्येच महापालिका गुंतली असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
पुणे महापालिकेने खासगी कंपन्या तसेच नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन विविध कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडामधून कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला. यातील निधी खर्च करण्यास महापालिका असमर्थ ठरत असल्याचा आरोप वेलणकर यांनी केला आहे. या साडेसात कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील रुग्णालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी करून गरजू पुणेकर रुग्णांची सोय करावी, अशी मागणीही वेलणकर केली आहे.
‘२०२०-२१ मध्ये ४ कोटी ८९ लाख, तर २०२१-२२ मध्ये महापालिकेला ३ कोटी १० लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या. मात्र, महापालिकेने २०२०-२१ मध्ये यातील एकही पैसा खर्च केला नाही, तर २०२१-२२ मध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी खाटा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी एक कोटी ३० लाख रुपये खर्च केले. हा खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेवर महापालिकेला ७० लाख रुपयांचे व्याज मिळाले आहे. सध्या पालिकेच्या कोविड सीएसआर खात्यात ७ कोटी ४३ लाख रुपये पडून आहेत’, असे विवेक वेलणकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे विमानतळावर भाजप युवा मोर्चा सचिवाला अटक; बॅगेत सापडले पिस्तूल अन् २८ जिवंत काडतुसे
-अजितदादा तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंपाशी? भर सभेत सुरेश धस यांचा सवाल
-संतोष देशमुख प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा; मनोज जरांगे पाटील मोर्चा अर्धवट सोडून का गेले?
-जनआक्रोश मोर्चाला पुण्यातील आमदार अन् खासदार गैरहजर; सुरेश धस म्हणाले “त्यांना रविवारी…”
-‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा