पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार सुरेश धस यांनी या हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. ‘अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत, अजित पवारांचं धनंजय मुंडे जवळ काय अडकलं आहे?’, असा सवाल धस यांनी भर सभेत उपस्थित केला आहे.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
“अजितदादा तुमचं यांच्याकडे काय अडकले आहे. यांना बाहेर जाऊ दे, अरे बाबा सातपुडा सरकारी बंगल्यावर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली तर मी चॅलेंज देतो. राजकारण सोडून देईल. माझ्याकडे ३०० गाईंचा गोठा आहे. १ हजार गाईंचा गोठा करेल. दोन-तीनशे म्हशी देखील आणेन. मी राजकारणात राहणार नाही, पण अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सर्वांनी मिळून या गोष्टीचा छडा लावा. या गोष्टी जर खऱ्या असतील तर काही दिवस जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्याला बाहेर काढा. आमची मागणी आहे”, असे सुरेश धस म्हणाले.
“सरकारच्या बाहेर त्यांना ठेवा. त्यांच्याकडून राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिन खात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्यायला सांगा. या देशांमध्ये लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा एक अपघात झाला म्हणून त्यांनी राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचे मार्क मागे-पुढे केले मुख्यमंत्रिपद गमावू लागलं, आर आर पाटलांना एका शब्दामुळे घरी जावं लागलं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तुमच्या सर्वांच्या पाया पडतो. तुम्हाला तुम्हाला विनंती करतो. याचा राजीनामा घ्या. इतकी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळू द्या”, अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे.
“माझी आत्ताच विनंती आहे. पुणे जिथे काय होणे, अशा ऐतिहासिक शहरांमधून मी मागणी करतोय. मायबाप सरकारने, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, अजितदादा यांना विनंती करतो, त्याला मंत्रिमंडळात ठेवू नये. अजितदादा फार प्रांजळ मनाचा माणूस आहे. ५ वर्षाच्या लेकरासारखे अजितदादाचे हृदय आहे आणि ते कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालत नाही. मी त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे मला माहिती आहे. मी राष्ट्रवादी २००५ पासून २०१७ पर्यंत होतो, जवळजवळ १०-१२ वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. त्यांच्याबरोबर मी काम केलं. अजितदादा असे नव्हते. अजितदादा मी तुमच्या पाया पडतो, तुमचं काय अडकले रे त्यांच्याजवळ?” असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संतोष देशमुख प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा; मनोज जरांगे पाटील मोर्चा अर्धवट सोडून का गेले?
-जनआक्रोश मोर्चाला पुण्यातील आमदार अन् खासदार गैरहजर; सुरेश धस म्हणाले “त्यांना रविवारी…”
-‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा
-पुणेकरांनी घेतली भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या नामस्मरणाच्या साधनेतून आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा