पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या केली. या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटल्याचे दिसले. आज पुण्यामधील लालमहल ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत सकल मराठा समाजाकडून जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या मूकमोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली होती. भाजपचे आमदार सुरेश धस, बीडचे खासदार बजरंग सोनावणे, संभाजीराजे छत्रपती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यलयाजवळ जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटलांनी मोर्चाला हजेरी लावली पण सभा सुरु होण्याआधीच ते माघारी फिरले.
मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना त्यांच्या चुलत भावाच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील मोर्चा अर्धवट सोडून जावे लागले. त्यामुळे जरांगे पाटील हे आजच्या जनआक्रोश मोर्चातून निघून गेले आहेत. ते सकाळी जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच ‘मी कोणतेही चितावणीखोर वक्तव्य केलेली नाहीत. आमची माणसं मारून टाका त्यांना कापा आणि आमची मुंडकी मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन द्या. असंच आता आम्ही सांगायचं का?’ असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जनआक्रोश मोर्चाला पुण्यातील आमदार अन् खासदार गैरहजर; सुरेश धस म्हणाले “त्यांना रविवारी…”
-‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा
-पुणेकरांनी घेतली भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या नामस्मरणाच्या साधनेतून आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा
-आण्णा, दादा अन् ताईंचं झालं आमचं काय? सत्ता आली तरीही पुण्यात भाजपचे निष्ठावंत धास्तावले