पुणे : अध्यात्मिक क्षेत्रातील महान विभूती भगवान श्री ऋषभ फकीर यांनी मानवजातीला शांतता, सत्य, आणि साधनेचा मार्ग दाखवला. गेली 70 वर्षाहून अधिक काळ देशभरात आयोजित केला जाणार भगवान श्री ऋषभ फकीर ‘नीलमणी’ पंचमी महोत्सव पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध समाज बांधव आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली. भगवान श्री ऋषभ फकीर यांचे नामस्मरण करत ध्यानधारणेद्वारे मेडीटेशन करत आत्मशांतीचा अनुभव यावेळी उपस्थित साधकांनी घेतला
आज (४ जानेवारी) एसपीकेजीएस नंदू भवन, पीजी हायस्कूलच्या बाजूला, आई माता मंदिर जवळ, कोंढवा बुद्रुक येथे भगवान श्री ऋषभ फकीर ‘नीलमणी’ पंचमी महोत्सव पार पडला. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात धर्मविरहित भक्ती-पूजा आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून शेकडो साधक तसेच सामान्य नागरिकांनी मेडिटेशन केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अडीअडचणींचा सामना करणाऱ्या कोणत्याही जाती धर्मातील बांधव भगवान श्री ऋषभ फकीर यांच्यापुढे स्वत:च्या इच्छेप्रमाणे ध्यानधारणा करू शकतात. गेली १० वर्षांपासून पुणे शहरात आम्ही हा महोत्सव आयोजित करत आहोत. आतापर्यंत ज्यांनीही श्री ऋषभ फकीर यांच्यापुढे मागणी केली, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे प्रतिपादन विश्वविधाता ऋषभ फकीर सेवा ट्रस्ट आलपाचे फकीर चरणोपासक अरविंद उर्फ पप्पूशेठ कोठारी यांनी यावेळी केले. जगात शांती राहावी, माणसाच्या आयुष्यात सुखशांती कायम राहावी, हाच महोत्सवाचा उद्देश असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
याप्रसंगी फकीर चरणोपासक राजेश परमार म्हणाले की, स्वयं को स्वयं की जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त हेतू, असा या महोत्सवाचा उद्देश आहे. अर्थात तुम्ही दर्शन घ्या, ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर दर्शनाद्वारे स्वत:च, स्वत:च्या कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं, या भावनेतून हा महोत्सव साजरा केला जातो. यात कुठल्याही जाती-धर्माचं बंधन नसून देशभरातील शेकडो लोक हा अनुभव घेतल्यामुळे वेगवेगळ्या शहरातून या दोन दिवशीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा
-आण्णा, दादा अन् ताईंचं झालं आमचं काय? सत्ता आली तरीही पुण्यात भाजपचे निष्ठावंत धास्तावले
-पुणेकरांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार; मुरलीधर मोहोळांनी दिली महत्वाची माहिती
-पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा
-वाल्मिक कराडसोबत व्हायरल फोटोवर सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘आमचे त्यांच्याशी संबंध…’