पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात सर्व पक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आज सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. पुण्यातील लालमहल ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. पुण्यातील या मूकमोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकजण उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील लालमहल येथून मोर्चाला सुरवात होत असून या मोर्चामध्ये ‘आरोपी वाल्मिक कराडला फाशी द्या’ अशा आशयाचे पोस्टर्स झळकत आहेत. तसेच ‘कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करा’ अशी देखील मागणी करण्यात येत आहे. ‘पोलीस कोणात्या दबावाखाली वागत आहेत. हा महाराष्ट्र आहे की बिहार? पुण्यात आरोपी सापडतात, कोणत्या मंत्र्यांचा यांना वरदहस्त आहे. ज्या कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त आहे त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा’, अशी मागणी देखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप असलेला वाल्मिक कराड पुण्यात पोलिसांना शरण आला. त्यानंतर शनिवारी या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातूनच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आण्णा, दादा अन् ताईंचं झालं आमचं काय? सत्ता आली तरीही पुण्यात भाजपचे निष्ठावंत धास्तावले
-पुणेकरांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार; मुरलीधर मोहोळांनी दिली महत्वाची माहिती
-पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा
-वाल्मिक कराडसोबत व्हायरल फोटोवर सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘आमचे त्यांच्याशी संबंध…’
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघांना बेड्या; आमदार रोहित पवार म्हणाले, ‘या महाराष्ट्रात…’