पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात हत्येचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. त्यानंतर आता बीड पोलिसांच्या विशेष पथकाने संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
सगळ्यांना माहित आहे आरोपी कोण आहे. आरोपीला आता पोलीस कोठडीमध्ये ठेवलं गेलं आहे. त्याचबरोबर असं कळतंय की राहिलेल्या तीन पैकी २ मारेकऱ्यांना पकडले आहे. पण अजून स्पष्टपणे कुठे समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियाची आणि तसेच महाराष्ट्रातील सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की, आता ज्यांना पकडले ते जर जबाबदार असतील तर लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये असं धाडस कधीही कोणीही करू नये, अशी प्रथा या सरकारने आणि प्रशासनाने या महाराष्ट्रात सुरू केली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत असून सर्व स्तरातून मारेकरी आणि सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी संपूर्ण राज्यभरातून करण्यात आली. अशातच वाल्मिक कराड हा पोलिसांना शरणा आल्यानंतर बीड पोलिसांच्या विशेष पथकाने घुले आणि सांगळेला बेड्या ठोकल्याचे समोर आल्यानंतर आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात डॉक्टरने घातली पालिकेला टोपी; पण असं फुटलं बिंग…
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, वॉन्टेंड आरोपींना पुण्यातून अटक
-अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
-भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” पंचमी महोत्सवात अनुभवायला मिळणार आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-ठाकरेंचे शिलेदार भाजपमध्ये अन् महायुतीत ठिणगी, ‘धनुष्यबाणाच्या जागा…’ शिंदेंचे शहराध्यक्ष भिडले