पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात हत्येचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. त्यानंतर आता महत्वाची अपडेट समोर येत आहे. बीड पोलिसांच्या विशेष पथकाने संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.
देशमुख खून प्रकरणी अधिक तपासासाठी दोघांनाही सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली या समितीचे अध्यक्ष आहेत. या पथकात बीडच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्यासह केज पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपायांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मारेकरी आणि सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी संपूर्ण राज्यभरातून करण्यात आली. या मागणीसाठी बीड जिल्ह्यात मोठा मोर्चा देखील काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘सरकार्यवाह’पदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
-भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” पंचमी महोत्सवात अनुभवायला मिळणार आत्मशांतीची दिव्य अनुभूती
-ठाकरेंचे शिलेदार भाजपमध्ये अन् महायुतीत ठिणगी, ‘धनुष्यबाणाच्या जागा…’ शिंदेंचे शहराध्यक्ष भिडले