पुणे : राज्यात पुन्हा एकदा महयुतीचे सरकार स्थापन झाले असून १ महिना उलटला आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झाले. काही नेत्यांना मंत्रिपदाची न मिळाल्याने नाराजी नाट्य देखील पहायला मिळाले. अशातच पुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणते बसणार याबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं भाष्य केलं आहे.
““पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात काहीही रस्सीखेच नाही. सर्व तुमच्या मनासारखं होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत योग्य तो निर्णय घेतील. पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणी काहीही म्हणू द्या, पण या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील””, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हणाले आहेत.
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सूचक भाष्य केलं होतं. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची पहायला मिळत आहे. पुण्याला कोणते दादा पालकमंत्री म्हणून लाभणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दारू नको दूध प्या जीवनाचा आनंद घ्या, आमदार रासनेंच्या संकल्पनेतून भाजपचा अनोखा उपक्रम
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे
-‘आता पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का?’- अंजली दमानिया
-अलिशान कारमधून एन्ट्री अन् पोलिसांना शरणागती; वाल्मिक कराडकडे कोणाची स्कॉर्पिओ?
-एक सिगारेट करतेय १७ मिनिटांनी आयुष्य कमी, मात्र एक जानेवारीला सिगारेट सोडल्यास…