पुणे : येत्या वर्षात कुंभमेळा मोठ्या उत्साहात होणार असून हा उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ‘भारत गौरव’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारत गौरव’ ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असल्याचे ‘आयआरसीटीसी’ पुणे विभागाचे व्यवस्थापक सुभाष नायर यांनी पत्रकार परिषद घेत पुणेकरांना कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणं सोईस्कर झाल्याचे सांगितले आहे.
येत्या १५ जानेवारी रोजी (बुधवारी) पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री १० वाजता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे. पुणे, वाराणसी, प्रयागराज, अयोध्या आणि पुन्हा पुणे असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रवाशांचा सात रात्र, आठ दिवसांचा प्रवास असून, या गाडीला ७ शयनयान डबे, वातानुकुलित डब्यांमध्ये (३ एसी, १ सेमी एसी), जेवण बनविण्यासाठी विशेष डबा, असे नियोजन आहे, असे ‘आयआरसीटीसी’ पुणे विभागाचे व्यवस्थापक सुभाष नायर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
‘पुणे ते प्रयागराज या गाडीमध्ये प्रवाशांना सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, जेवण व्यवस्था आदी सुविधांसह प्रवासी वाराणसी, प्रयागराज आणि अयोध्या या ठिकाणी उतरल्यानंतर राहण्यासाठीची विशेष सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी डब्यांच्या आरक्षणानुसार प्रवासी शुल्क आकारले जाणार आहे,’ असे नायर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आता पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का?’- अंजली दमानिया
-अलिशान कारमधून एन्ट्री अन् पोलिसांना शरणागती; वाल्मिक कराडकडे कोणाची स्कॉर्पिओ?
-एक सिगारेट करतेय १७ मिनिटांनी आयुष्य कमी, मात्र एक जानेवारीला सिगारेट सोडल्यास…
-Pune News: थर्टी फर्स्टला फुल तर्राट, हॉटेल सोडणार थेट घरात
-Big Breaking: वाल्मिक कराड स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण