पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर आता सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केला आहे.
आज त्यांना शेवटी अटक झाली आहे. यातून पुढे सगळी चौकशी व्हायला हवी. या गोष्टीला २० दिवस लागले हे शॉकिंग आहे. ते (वाल्मिक कराड) पुण्यात शरण आलेत. १७ तारखेला त्यांच्या मोबाईलवरून केलेला शेवटचा कॉल पुण्यातला होता. आज ३१ तारखेला ते पुण्यातच शरण आले असतील तर याचा अर्थ ते इतके दिवस पुण्यातच होते. आता आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृहमंत्रालय कॉम्प्रोमाईज्ड आहे का? हा प्रश्न पडतोय”, असं अंजली दमानिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या आहेत.
“हे सगळे राजकारणी एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. त्यांचे सगळ्यांबरोबर संबंध होते. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या सगळ्यांबरोबर त्यांचे फोटो आहेत. जर गुन्हेगार लोकांचे राजकारण्यांशी संबंध असतील तर आपल्याला न्याय कधी मिळेल हा प्रश्न पडतो”, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अलिशान कारमधून एन्ट्री अन् पोलिसांना शरणागती; वाल्मिक कराडकडे कोणाची स्कॉर्पिओ?
-एक सिगारेट करतेय १७ मिनिटांनी आयुष्य कमी, मात्र एक जानेवारीला सिगारेट सोडल्यास…
-Pune News: थर्टी फर्स्टला फुल तर्राट, हॉटेल सोडणार थेट घरात
-Big Breaking: वाल्मिक कराड स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण
-न्यू ईयरसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दारु पिऊन गाडी चालवाल्यास….