पुणे : पुणे शहरात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने पब, हॉटेल्स पहाटे ५ पर्यंत सुरु राहणार आहेत. ३१ डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मद्यपान करत असतात. यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह, अपघात, अनुचित प्रकार घडत असतात. या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. हॉटेलमधील तळीराम ग्नाहकांना हॉटेलच्याच गाडीने घरी सोडण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जास्त ड्रिंक झालेल्या तळीरामांकडून अपघात होऊ नयेत म्हणून त्यांना हॉटेलच्या गाडीने घरापर्यंत सोडण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे हॉटेल असोशिएनने हा अंशत: हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तळीरामांकडून होणारे अनुचित प्रकार आणि अपघात टाळता येणार आहेत.
दरम्यान, ३१ डिसेंबरच्यानिमित्ताने मद्यपान करत न्यू ईयरचे सेलिब्रेशन करणाऱ्यांची संख्या जास्त असून अति मद्यपान केल्याने काही ग्रुपमध्ये अंतर्गत किंवा दुसऱ्यांशी वाद होण्याची शक्यता जास्त असल्याचंही हॉटेल व्यवसायिकांचं म्हणणं आहे. मद्यपान केलेला व्यक्ती गाडी चालवण्याच्या अवस्थेत नसेल तर हॉटेलची गाडी किंवा ओला कॅब करुन मद्यपान केलेल्यांना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था हॉटेल मालकांकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Big Breaking: वाल्मिक कराड स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण
-न्यू ईयरसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दारु पिऊन गाडी चालवाल्यास….
-पुणे पोलीस म्हणतात 31 डिसेंबरसाठी आम्हीही तयार, CCTV करणार लाईव्ह मॉनिटरिंग अन् मद्यपींवर…
-दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांच्या आमदाराचे सूचक विधान