पुणे : बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड पोलिसांनीा शरण आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसच्या मुख्यालयामध्ये शरण आला आहे.
वाल्मिक कराड काय म्हणाले?
मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे.
राष्ट्रवादी काँग्रसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते. बीड जिल्ह्यामध्ये २८ डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. वाल्मिक कराडला सरकारमधील मंत्र्यांचा वरदहस्त असून त्याला पाठिशी जात असल्याचा आरोप विरोधक आणि सामान्य जनतेकडून केला जात होता. अखेर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. आता या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-न्यू ईयरसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दारु पिऊन गाडी चालवाल्यास….
-पुणे पोलीस म्हणतात 31 डिसेंबरसाठी आम्हीही तयार, CCTV करणार लाईव्ह मॉनिटरिंग अन् मद्यपींवर…
-दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादांच्या आमदाराचे सूचक विधान