पुणे : पुणे शहराच्या मुख्य परिसरातील शिवाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बस स्थानक सर्व सोयी सुविधांनी आणि अत्याधुनिक संकल्पनेनुसार साकारण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथे बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात लवकरच सामंजस्य करार केला जाणार आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून शिवाजीनगरमधील बहुद्देशीय वाहतूक केंद्राचे काम रखडले होते.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी रखडलेल्या प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीनंतर अजित पवार सोमवारी शिवाजीनगर मेट्रो स्थानक आणि एसटी महामंडळ बस स्थानकाबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि महामंडळाचे अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन तातडीने कामकाज सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सार्वजनिक, खासगी आणि भागीदारी (पीपीपी) तत्वानुसार महामेट्रो संपूर्ण वाहतुकीच्या दळवळणाला अनुसरून हे केंद्र बनविण्यात येणार आहे. अजित पवारांनी यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून महामंडळ आणि महामेट्रो यांच्यामध्ये संयुक्त विकासासाठी सामंजस्य कराराबाबत संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर सचिवांना तातडीने या कामासंदर्भात करार करून निविदा प्रक्रिया राबवून तातडीने काम सुरु करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या विकासात भर; अजित पवारांची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक
-वाघोलीत भरधाव डंपरने घेतला तिघांचा बळी; मद्यधुंद चालकाने फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं
-पुण्याच्या पालकमंत्रिपदाबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘यॉर्कर टाका, गुगली टाका, मी पण बॅट्समन’
-Pune: अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना नाव बदलासाठी धमकीचे फोन
-महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? संजय राऊत म्हणाले, ‘मुंबईत लढावंच लागेल पण…’