पुणे : दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काहीना काही वाद झाल्याचे पहायला मिळत असते. यावर्षी देखील असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. यंदा ९८ वे साहित्य संमेलन हे दिल्ली येथे पार पडणार आहे. या संमेलनाच्या आयोजकांना धमकावलं जात असल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी एका वृत्तवाहिनीला याबाबची माहिती दिली आहे.
या कार्यक्रमासाठीची पत्रकार परिषद पार पडली. त्यानंतर आम्ही त्याबाबची माहिती असणारे दोन पानांचे लिफलेट वाटले. तेही अगदी फायनल नव्हते. त्यात आम्ही काही नाव दिली होती. दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे तर संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ, अन्य दोन सभागृहांना काकासाहेब गाडगीळ आणि लोकमान्य टीळकांचे नाव देऊ अशा आम्ही घोषणा केल्याचे नाहर यांनी सांगितले.
आम्ही साहित्य संमेलनाने भूमिकेमध्ये दोन्ही विचारांच्या टोकांना नेहमी स्वीकारलेलं आहे. आम्ही आयोजक आहोत. काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय महामंडळ घेईल. त्यामुळे तुम्ही त्यांना लिखीत द्या असं सांगितलं आहे, महामंडळांना सांगून काही बदल केले जातील. मात्र, काही जण हे केलं नाही तर त्रास होईल तुम्हाला. महाराष्ट्राच्या आस्मितेसाठी संघर्ष करावा लागेल, असंही काही जण सांगत असल्याचे संजय नाहर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार? संजय राऊत म्हणाले, ‘मुंबईत लढावंच लागेल पण…’
-पुणेकरांनो सावधान! सिग्नल मोडणं पडतंय महागात; ११ महिन्यात ४२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
-क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत पुण्यानं पटकावलं पाचवा क्रमांक; कशात केली सर्वाधिक गुंतवणूक?
-पुण्यात थंडी घटली पण थंडगार वाऱ्यामुळं पसरली धुक्याची चादर
-रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणं पडलं महागात; नळ स्टॉपवरील ‘त्या’ स्टॉल धारकांवर गुन्हे दाखल