पुणे : क्रिप्टो म्हणजेच आभासी चलन गुंतवणूकदारांची भारतात मोठी संख्या आहे. देशातील प्रमुख १० शहरांमध्ये यंदा पुणे हे शहर पाचव्या क्रमांकावर आहे. ‘कॉइनस्विच’ने ‘इंडियाज क्रिप्टो पोर्टफोलिओ २०२४ हाऊ इंडिया इन्व्हेस्ट्स’ हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून सर्वाधिक परतावा मिळणारे आभासी चलन गुंतवणूकदारही पुण्यातीलच असल्याचे समोर आले आहे. देशातील वैविध्यपूर्ण आभासी चलन परिसंस्था आणि डिजिटल मालमत्तेत वाढत असलेला सहभाग यावरही या अहवालात स्पष्ट केले आहे.
देशातील प्रमुख १० शहरांमध्ये आभासी चलन गुंतवणुकीत पुणे पाचव्या स्थानी आहे. गुंतवणूकदारांमधील ७६ टक्के पुरुष आणि २४ टक्के महिला आहेत. पुण्यातील सर्वाधिक ३९ टक्के गुंतवणूकदारांकडून लार्ज कॅपला पसंती दिली जात आहे. त्यानंतर ब्ल्यू चिप ३१ टक्के, मिड कॅप २६ टक्के आणि स्मॉल कॅप ४ टक्के असे गुंतवणूक करण्यात आली आहे. पुण्यातील ८६ टक्के गुंतवणूकदार फायद्यात, तर १४ टक्के गुंतवणूकदार तोट्यात आहेत, असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
भारतातील क्रिप्टोमध्ये (आभासी चलन) एकूण गुंतवणूकदारांपैकी ७५ टक्के गुंतवणूकदार हे ३५ वर्षांखालील आहेत. तसेच ३६ ते ४५ वयोगटातील गुंतवणूकदारांची संख्याही सातत्याने वाढताना दिसत आहे. या अभासी चलन गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. एकूण गुंतवणूकदारांपैकी ११ टक्के गुंतवणूकदार या महिला असल्याचे ‘कॉइनस्विच’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात थंडी घटली पण थंडगार वाऱ्यामुळं पसरली धुक्याची चादर
-रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणं पडलं महागात; नळ स्टॉपवरील ‘त्या’ स्टॉल धारकांवर गुन्हे दाखल
-आता आरटीओला न जाताही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; कसं? वाचा सविस्तर…
-नागरिकांच्या दारात बँड वाजवला, करबुडव्यांच्या मिळकती जप्त, पालिकेची १८ दिवसांत ४० कोटींची वसुली
-मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी