पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात वातावरणात वारंवार बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात चांगलीच थंडी जाणवत होती. दिवसभर हवेत गारवा असताना मध्यंतरी पुन्हा गर्मी जाणवू लागली होती. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तापनाचा पारा घसरला आहे. पुणे शहरात तब्बल ६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. पुणेकरांना दिवसाही चांगलीच हुडहुडी भरली होती. आता वाढलेला थंडीचा जोर आता कमी झाला आहे. मात्र, हवेतील गारवा कायम असून तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आता दाट धुके पडल्याचेही पहायला मिळत आहे.
आज (शनिवारी) पहाटेपासून मावळ तालुक्यावर धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळं द्रुतगती मार्ग असेल किंवा मुंबई पुणे लोहमार्ग दोन्हीही मार्गवरील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. शहर आणि परिसर दाट धुक्यामुळे उंच इमारती दिसत नव्हत्या. विशेषतः मुंबई-पुणे महामार्गावर दाट धुक्यामुळे वाहनचालकांना त्रास होत होता.
चार दिवसांपूर्वीच यंदाच्या थंडीच्या हंगामातील आतापर्यंतच्या किमान तापमानाची नोंद झाली होती. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी शिवाजीनगर येथे १२.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणं पडलं महागात; नळ स्टॉपवरील ‘त्या’ स्टॉल धारकांवर गुन्हे दाखल
-आता आरटीओला न जाताही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; कसं? वाचा सविस्तर…
-नागरिकांच्या दारात बँड वाजवला, करबुडव्यांच्या मिळकती जप्त, पालिकेची १८ दिवसांत ४० कोटींची वसुली
-मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी
-पोलीस बांधवांच्या घरांसाठी आमदार रासने आक्रमक; विधानसभेत प्रश्न मांडत पुनर्विकासाची मागणी