पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबाने आज (गुरुवारी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेचे अधिवेशन सुरु असताना देखील नरेंद्र मोदी यांनी मोहोळ कुटुंबासाठी वेळ काढला आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी आज आम्हा मोहोळ कुटुंबियांना मिळाली. संसदेचे अधिवेशन सुरु असताना त्यांनी अत्यंत व्यस्त असताना सुध्दा दिलेला वेळ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुखावून गेला. माझी आई, पत्नी, मुली, भाऊ आणि कुटुंबातील प्रत्येकाशी मोदीजींनी संवाद साधला. प्रत्येकाशी मराठीतून केलेली विचारपूस आणि खुशाली विचारताना स्पष्ट दिसलेली आत्मीयता भावणारी होती’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
स्वप्नपूर्ती का और एक पल… हमारे मोहोळ परिवार की प्रधानमंत्री मा.श्री नरेंद्र मोदी जी से संस्मरणीय भेंट !
देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी से आत्मीय संवाद करने अवसर आज मोहोळ परिवार को प्राप्त हुआ । संसद का शीतकालीन सत्र और समय की आत्यंतिक व्यस्तता के बावजूद… pic.twitter.com/LpriheaIRF
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 19, 2024
“भाजपमध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून ते आजपर्यंत कुटुंबियांनी मला अविरत साथ दिली. त्या कुटुंबियांना पक्षाच्या आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट आपुलकीचा संवाद होतो, हे फक्त भारतीय जनता पक्षातच होतं. मोदीचे आम्हा मोहोळ कुटुंबियांच्या वतीने मनापासून धन्यवाद! आभार मानण्याऐवजी त्यांच्या ऋणात राहूनच धन्यवाद व्यक्त करतो. भाजप हा केवळ पक्षच नाही, तर परिवार आहे, याची आणखी अनुभूती देणारे क्षण आयुष्यभरासाठी स्मरणात राहतील”, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-चेहरा भोळा अन् कुटाने सोळा! प्रसिद्ध बिल्डरचे ४ कोटी लुटणाऱ्या गुडियाला बेड्या
-‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार
-मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान
-सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ
-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार