पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला ४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आणि जिच्यामुळे तब्बल ६ पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं होतं ती गुडिया उर्फ सानिया सिद्दिकीला पुणे पोलिसांनी आता बिहारमधून अटक केली आहे. पुणे पोलीस दलातील जिगरबाज महिला पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या टीमने बिहारमध्ये वेषांतर करुन सापळा रचला आणि सानियाला बेड्या ठोकल्या.
अवघ्या २३ वर्षाच्या सानिया सिद्दिकी या तरुणीने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा नंबर वापरत तिने स्वतः बोलत असल्याचा भासवलं आणि कंपनीच्या अकाउंटंटकडून तब्बल ४ कोटी रुपये उकळले होते. अकाउंटंट यांनी विश्वास ठेवत कंपनीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध अकाउंटवर ४ कोटी रुपये पाठवले. या गुन्ह्यात पोलिसांनी तिला फरीदाबादमधून ताब्यात घेतले होते. मात्र, पुण्यात येत असताना तिने पोलिसांना चकवा देत पळ काढला. या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या ६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.
६ पोलिसांना निलंबित केल्यानंतर या गुडिया उर्फ सानियाला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वात एक टीम तयार केली. ‘आमच्या टीमने बिहारच्या वेगवेगळ्या शहरात जाऊन, वेषांतर करून मोठा जिकिरीने अखेर गुडियाला बेड्या ठोकल्या आणि तिला आम्ही पुण्यात घेऊन आलो’, असे पोलीस निरिक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले आहे.
बिहारमधील गोपालगंज भागातील काही स्थानिक पत्रकारांना माहिती घेण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोपालगंज येथे एका शेतात ती राहत असलेल्या घराबाहेर सापळा रचून सानियाला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला पुण्यात आणलं, असे पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले आहे. आरोपी गुडिया सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून तिने आणखी कोणाची फसवणूक केली? तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे? याबाबतचा अधित तपास पुणे पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘लाडक्या बहिणीं’साठी खूशखबर! फडणवीसांनीच सांगितलं योजनेचा हफ्ता कधी येणार
-मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान
-सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ
-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार
-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?