नागपूर : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून हे अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून गेल्या अनेक दिवसांपासून डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणींचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
आमच्या सरकारने सुरु केलेल्या कोणत्याही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं त्या सर्व लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हफ्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात टाकणार आहोत. आणि या योजनेमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
कोणतेही निकष न लावता सर्वांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हफ्ता बँक खात्यात जमा होणार आहे. समाजात चांगली माणसे आहेत तशीच वाईट प्रवृत्तीची देखील आहेत. अनेकांनी चार चार खाती खोलून या योजनेचा लाभ घेताना आढळून आले आहे. त्यामुळे एका ठिकाणी तर पुरूषानेच ९ खाती खोलली आहेत. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना वगळ्यात येणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मरावे परि अवयव रुपी उरावे; तिच्यामुळे आठ जणांना मिळाले जीवदान
-सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला; भारतीय शेअर बाजारात मोठी खळबळ
-‘पबला विरोध नाही तर होणाऱ्या गैरप्रकारांना, मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर’- अमितेश कुमार
-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी पुणे मेट्रोची गुडन्यूज; आता मेट्रो धावणार…