पुणे : पुणे शहर विद्येचं माहेरघर असल्याची ख्याती जगप्रसिद्ध असल्यामुळे परराज्यातील अनेक तरुण शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी पुणे शहरात येत असतात. तसेच शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पब संस्कृती सुरु झाली आहे. मात्र काही महिन्यांपासून या पब संस्कृतीत भर पडून अनेक अमली पदार्थांची तस्करी, तसेच सेवन केल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे पुणे शहराला आणि शहराची प्रतिमा मलीन झाल्याचे अनेकदा बोलले गेले. या पार्श्वभूमीवर पबला विरोध नाही. मात्र, पबच्या नावाखाली सुरू गैरप्रकारांना पोलिसांचा विरोध असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत. पोलीस आरोग्य मित्र फाऊंडेशन आणि सुभाषनगर माडीवाले काॅलनी मंडळाकडून बुधवारी ‘काॅफी विथ सीपी’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील पब संस्कृतीबाबत भाष्य केले आहे.
“पबला विरोध नाही. मात्र, पबच्या नावाखाली सुरू गैरप्रकारांना पोलिसांचा विरोध आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील आवाजामुळे सामान्यांना त्रास होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पबचालकांसाठी नियमावली ठरवण्यात आली. पब चालक, सांगीतिक कार्यक्रम किंवा जाहीर ठिकाणी ध्वनिवर्धक, लेझर झोत वापरणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. उत्सवाच्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या ध्वनिवर्धकांबाबत पुणेकरांनी जागरुक होऊन विरोध करायला हवा”, असे अमितेश कुमार म्हणाले आहेत.
‘शहराचे रूपांतर महानगरात झाले आहे. महानगरातील ‘पब कल्चर’, सांगीतिक कार्यक्रमांना विरोध नाही. मात्र, पबचालक, तसेच सांगीतिक कार्यक्रमांच्या आयोजकांनी नियमांच्या अधीन राहून व्यवसाय केला पाहिजे. सामान्यांना त्याचा त्रास होता कामा नये. पुण्यात परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या वाढती आहे. महानगरात अनेक सोयी सुविधा निर्माण होतात. पब हा प्रकार किंवा व्यवसाय त्यापैकी एक आहे. पबमुळे संस्कृतीला धक्का पोहोचतो. गैरप्रकार होतात, अशी टीका करण्यात आली. पबमुळे पुणेकरांच्या अस्मितेला अजिबात धक्का पोहोचणार नाही. कारण मूळ पुणेकर असल्या प्रकारांपासून दूर असल्याचंही पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘माझं मंत्रिपद कापण्या इतपथ त्यांची पोहोच नाहीये’; विजय शिवतारेंचा रोख नेमका कोणाकडे?
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी पुणे मेट्रोची गुडन्यूज; आता मेट्रो धावणार…
-स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या अंतरात होणार बदल; किती अंतरावर असणार स्थानके?
-धक्कादायक! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा: ११ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
-‘…तर आमच्याकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल’; भुजबळ समर्थकांना दीपक मानकरांचा इशारा