पुणे : पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. पीएमआरडीए अंतर्गत (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सावर्जनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडित यांनी सांगितले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८५ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात नेहा पंडित बोलत होत्या. पुणे मेट्रोचा आता आयटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सार्वजनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. त्यासाठी जर्मनमधील एक खासगी कंपनीही सहयोगी आहे. तब्बल ७ हजार कोटींच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती नेहा पंडित यांनी दिली आहे.
पुणे शहर आणि उपनगरात मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. प्रवासी हा मुख्य केंद्रबिंदू डोळ्यांसमोर ठेवून मेट्रोकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मेट्रोत नव्याने सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुलभ आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य दिले, तरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मेट्रो सक्षम होईल, असे देखील नेहा पंडित म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट-कात्रज मार्गावरील मेट्रो स्थानकांच्या अंतरात होणार बदल; किती अंतरावर असणार स्थानके?
-धक्कादायक! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा: ११ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
-‘…तर आमच्याकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल’; भुजबळ समर्थकांना दीपक मानकरांचा इशारा
-आंतरजातीय विवाह केला? घरच्यांचा विरोध; आता सरकारच देणार रहायला खोली
-पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई; आमदार लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष