पुणे : पुणे शहरात मेट्रोचे जाळे पसरत असून अनेक मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो सुरळीतपणे सुरु आहे. आता स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील बालाजीनगर येथील स्थानक भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर होणार आहे. भारती विद्यापीठ प्रवेशद्वार आणि बालाजीनगर या दोन्हीत मिळून एकच स्थानक होणार असल्यामुळे स्थानिकांकडून या अंतरावरुन प्रश्न उपस्थित केले होते. म्हणून आता ‘महामेट्रो’कडून विविध स्थानकांमधील अंतर निश्चित करण्यात आले आहेत.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील सर्वात २.११ किलोमीटर इतक्या अंतराचा एकमेव टप्पा मार्केट यार्ड ते पद्मावतीदरम्यानचा असेल. उर्वरित २ मेट्रो स्थानकांमधील अंतर एक ते सव्वा किलोमीटरपर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तिकीटाचे दरही निश्चित केले जाणार आहे. स्वारगेट ते मार्केट यार्ड – १.३१ किलोमीटर, मार्केट यार्ड ते पद्मावती – २.११ किलोमीटर, पद्मावती ते भारती विद्यापीठ – १.२३ किलोमीटर, भारती विद्यापीठ ते कात्रज – १ किलोमीटर, असे अंतर असणार आहे.
स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गावरील भारतीय विद्यापीठ येथे नवीन स्थानक निर्माण झाल्याने या मार्गावरील अंतरामध्ये फरक पडला, हे निश्चित आहे. मात्र, नवीन स्थानकामुळे परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार असून, अंतराची सुनिश्चितता करून स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे’, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा: ११ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
-‘…तर आमच्याकडूनही जशास तसं उत्तर दिलं जाईल’; भुजबळ समर्थकांना दीपक मानकरांचा इशारा
-आंतरजातीय विवाह केला? घरच्यांचा विरोध; आता सरकारच देणार रहायला खोली
-पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई; आमदार लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष
-उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; बंद दाराआड नेमकं घडलं काय? चर्चेला उधाण