नागपूर | पुणे : महायुती सरकारचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. मात्र विरोधकांमधून कोणीही यावेळी उपस्थित राहिले नाही. याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी शपथविधीनंतरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल १० ते १५ मिनिटे चर्चा झाली आहे. विषयावर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीवर ठाकरे यांनी बोलणं टाळलं आहे. या भेटीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जाती, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली वैगरे हे प्रश्न आहेतच. त्याबाबत जनतेत जाऊन आवाज उचलत राहू.”
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पुस्तक महोत्सवाचा महाकुंभ! पुणेकरांसह देशभरातील वाचनप्रेमींना घातली भुरळ
-पुणेकरांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देणं पडणार महागात; वाचा काय आहे शिक्षा?
-कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक
-धक्कादायक! बिर्याणी बनली मित्राच्या खूनाचं कारण; नेमका काय प्रकार?
-मंत्रिमंडळ विस्तार होताच पुण्यातील ‘त्या’ स्मारकाबाबत मोठा निर्णय; संरक्षित स्मारकाचा दर्जा देणार