पुणे : पुणेकरांनो अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देण्याआधी ही महत्वाची बातमी वाचाच. अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात गाडी देणं आता तुम्हाला महागात पडणार आहे. पुणे शहरातील विविध भागामध्ये प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजेच आरटीओने अल्पवयीन वाहनचालकांविरोधात तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या तपासणीत वाहनचालक अल्पवयीन असल्याचे आढळल्यास त्या अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना ३ वर्षाचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपयांचा दंड, अशी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याचे प्रकार आता मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता असल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोठी पाऊले उचण्यात येत आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १८ वर्षांखालील वाहनचालक आढळल्यास वाहनाच्या मालकास शिक्षेची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘५० सीसी’पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम १८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी १८ वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मनाई आहे. असे वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, आई वडिलांना देखील ३ वर्षे तुरुंगवास किंवा २५ हजार रुपयांचा दंड शिक्षेची तरतूद आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये मुलींचाही समावेश आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघातासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन वाहनचालकांबाबत तपासणी सुरू करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कात्रज चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार; पालिका आयुक्तांनी घेतली महत्वाची बैठक
-धक्कादायक! बिर्याणी बनली मित्राच्या खूनाचं कारण; नेमका काय प्रकार?
-मंत्रिमंडळ विस्तार होताच पुण्यातील ‘त्या’ स्मारकाबाबत मोठा निर्णय; संरक्षित स्मारकाचा दर्जा देणार
-‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी
-पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद