Shri Swami Samarth : ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य ऐकताच स्वामी समर्थांचं रुप डोळ्यासमोर उभारल्याशिवाय राहत नाही. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे लाखो भक्त आहेत. ‘आपण कर्म करत राहायचं, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच’ हे मानत स्वामींची भक्ती करणाऱ्या भक्तांना स्वामी प्रत्येक संकटातून तारतात, असा अनेक भक्तांना विश्वास आहे. अनेकांना आपल्याला आलेला अनुभव देखील सांगितला आहे.
स्वामींची भक्ती, त्यांचे उपदेश हेच आपल्याला अनेक संकटातून मुक्त करत असतात. कितीही संकटे आली तर त्यात स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागले तर आपल्या जीनवाचे सार्थकी लागणारच, असाही विश्वास भक्त सांगतात. स्वामी सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असतात. जगी जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे आजचे प्रेरणादायी उपदेश काय हे पाहणार आहोत.
स्वामींचे सुखी जीवन जगण्यासाठीचे उपदेश
- अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
- खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते.
- तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे.
- तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.
- रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे.
- ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.
- स्वामी समर्थांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात.
- माणूस विचार करतच असतो. पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे आहे.
- गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही.