पुणे : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडाळाचा विस्तार झाला. पुण्यातून ३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागलीच पुण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील एका स्मारकाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. खडकी येथील होळकर छत्री आणि महादेव मंदिराला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठीची कार्यपद्धती पूर्ण झाली असल्यामुळे होळकर छत्रीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिसूचनेचा इंग्रजी आणि मराठीतील अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
खडकी कटळ मंडळाच्या परिसरात मुळा नदीच्या काठावर होळकर छत्री ही ऐतिहासिक वास्तू आहे. होळकर छत्री आणि शिवमंदिर ही ऐतिहासिक वास्तू इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटीज ट्रस्ट यांची ही खासगी मालमत्ता आहे. होळकर छत्री येथे मराठा साम्राज्यातील होळकर घराण्यातील दोन स्मारके आणि महादेवाचे मंदिर आहे. तटबंदीयुक्त असलेली ही होळकर छत्री, शिवमंदिराचे शिखर १८व्या शतकातील मराठा शैलीतील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभागाच्या संचालकांनी अधिसूचनेची प्रत या स्मारकाजवळ ठळक ठिकाणी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही होळकर छत्री प्रसिद्ध होळकर पुलाजवळ स्थित आहे. छत्रीलगत असलेल्या नदीच्या काठावर दगडी घाट बांधला आहे. तटबंदीयुक्त असलेली ही होळकर छत्री, शिवमंदिराचे शिखर १८व्या शतकातील मराठा शैलीतील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अडिच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी नकोय, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नाहीत; शिवतारेंची नाराजी
-पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद
-शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा संचालक ते कॅबिनेट मंत्री; दत्तात्रय भरणेंची राजकीय कारकिर्द
-नागपूरात शपथविधी अन् बारामतीत फडणवीसांचा बॅनर जाळला; नेमकं काय घडलं?
-मैत्रीसाठी केला मोठा गुन्हा; मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून केला गोळीबार, अन्….