पुणे : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अनेक नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्याने महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमधील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांनीही नाराजी बोलून दाखवली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना शिवतारे यांनी मिळालेल्या वागणुकीवरुन राग व्यक्त केला आहे. ‘आम्ही कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हे’, अशा तिखट शब्दात शिवतारेंनी रोष व्यक्त केला आहे.
“मंत्रिपद मिळाले नाही, याचं काही वाटत नाही. पण त्यापेक्षा आम्हाला मिळालेल्या वागणुकीचं वाईट वाटतं. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी १०० टक्के आहे. आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे”, अशी जाहीर नाराजी विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली आहे.
“मंत्रिपद न मिळाल्यामुळे १०० टक्के राग नाही. आता अडीच वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे”, असेही विजय शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना भरली हुडहुडी; आतापर्यंत सर्वात कमी तापमानाची नोंद
-शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा संचालक ते कॅबिनेट मंत्री; दत्तात्रय भरणेंची राजकीय कारकिर्द
-नागपूरात शपथविधी अन् बारामतीत फडणवीसांचा बॅनर जाळला; नेमकं काय घडलं?
-मैत्रीसाठी केला मोठा गुन्हा; मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून केला गोळीबार, अन्….
-स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेचं उचललं महत्वाचं पाऊल