पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला चांगलेच यश मिळाले. भाजपला महाराष्ट्रात १३२ जागा मिळाल्याने राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर सर्व स्तरातून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव झाला. अशातच आता बारामतीमध्ये एका बॅनरवरुन चांगलाच वाद पेटला आहे. देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेला बारामतीतील बॅनर अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्यानंतर भाजपकडून बारामतीमध्ये नगर परिषदेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर फडणवीसांचा ‘चाणक्य’ असा उल्लेख देखील केल्यामुळे काही अज्ञातांनी हा बॅनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो उर्वरीत बॅनर खाली उतरवला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हेच चाणक्य असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या परभावानंतर आता मविआला डिवचण्यासाठी भाजपने हा बॅनर लावण्यात आल्याची चर्चा बारामतीतमध्ये सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मैत्रीसाठी केला मोठा गुन्हा; मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून केला गोळीबार, अन्….
-स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिकेचं उचललं महत्वाचं पाऊल
-कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाचं पाऊल; जिल्ह्यात २७ तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
-‘जे नेते आधी काका मला वाचवा, म्हणत होते तेच आता…’; सुनील शेळकेंचा शरद पवारांच्या नेत्यांना टोला
-‘दोन्ही नेते एकत्र आले तर ‘त्यांची’ कुचंबणा होईल’; रुपाली पाटलांचा निशाणा कोणावर?