पुणे : ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीवरुन राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकत्र यावेत असा सूर दोन्ही पक्षातून उमटत आहे. अशातच आमदार रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी देखील विखुरलेलं कुटुंब एकत्र आलं मूठ घट्ट असेल तर ताकद वाढते, असं सूचक वक्तव्य करत दोन्ही नेते एकत्र यावेत अशी भावना व्यक्त केली आहे. यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“दोन पवार एकत्र आले तर शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांची कुचंबणा होईल. मुळात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडण्यात अंकुश काकडे आणि त्यांच्यासारख्या इतर नेत्यांचाच जास्त सहभाग आहे. उद्या अजित पवारांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य असेल. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी तो निर्णय आम्हाला मान्यच असेल. उद्या जर दोन्ही गट एकत्र आले तर अजित पवारांवर बेछूट आरोप करणाऱ्या नेत्यांचीच अधिक कुचंबणा होईल’, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.
“सुनंदा पवार या कुटुंबाचा घटक आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याची भावना बोलून दाखवली. पण आमच्यासाठी अजित पवार जो निर्णय घेतील, तो महत्त्वाचा असेल. जेव्हा फूट पडली, तेव्हा प्रत्येकालाच याबद्दल दुःख वाटले होते. वेगळे न होता आपली वज्रमूठ घट्ट राहिली पाहीजे, असे सर्वांनाच वाटते. लोकसभा आणि विधानसभेच्या निकालानंतरही अजित पवार यांनी समोरच्या लोकांवर टीका केली नाही. पण शरद पवार यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनीच अजित पवारांवर नको ती टीका केली”, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणाला जेलमध्ये टाकायचं हे…’; रावसाहेब दानवेंचा रोख नेमका कोणाकडे?
-फडणवीस आज पुण्यातील मंत्री करणार फिक्स! कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?
-‘पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील’; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा
-पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे ३ किलो दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
-महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?