पुणे : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवरुन राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? यावरुन अनेक चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही पक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांकडून तसेच पवार कुटुंबातील काही सदस्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवार तसेच आमदार रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी देखील सूचक वक्तव्य केलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
‘अजितदादांनी काल शरद पवारसाहेबांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, ही चांगली बाब आहे. पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला. असं झालं तर आम्हाला आनंदच होईल. आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन्ही पवारांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, याचा फायदाच होईल. भविष्यात काय होईल सांगता येत नाही’, असं अंकुश काकडे म्हणाले आहेत.
‘कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे की, दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावं. तसे झाल्यास आनंदाची गोष्ट असेल. पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही. पवार साहेबांच्या निर्णयाला कोणताही कार्यकर्ता, पदाधिकारी विरोध करेल, असं वाटत नाही’, असेही अंकुश काकडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील ‘ही’ बँक बनली मंदिर! साडे ३ किलो दत्त मुर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
-महापालिका निवडणूक कधी होणार? इच्छुकांचे जीव टांगणीला, पडद्यामागे काय घडतंय?
-काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
-‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार
-Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?