पुणे : महाराष्ट्रमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकडे लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती प्रचंड बहुमत मिळवत पुन्हा सत्तेवर आली आहे. तर महाविकास आघाडीला बोटावर मोजण्या इतक्या जागांवर विजय मिळाला. येत्या एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीय, मात्र या संदर्भात न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांमुळे निवडणुका रखडणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आरक्षण, संस्थांमधील सदस्य संख्या, प्रभाग रचना कशी असावी, प्रभाग रचना करणारे अधिकारी सरकारचे की निवडणूक आयोगाचे, तसेच ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात तब्बल २८ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. जवळपास २ वर्ष या याचिका प्रलंबित असून यावर येत्या २२ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकांवरील सुनावणीनंतर निकाली येईल, त्यानुसार राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी आणखीन प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
राज्यात एकूण पंचायत समितीच्या २८९, नगरपालिकेच्या २४३, नगरपंचायतीच्या ३७, महापालिकेच्या २७ तर जिल्हा परिषदेच्या २६ अशा निवडणुका रखडलेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काका-पुतणे एकत्र येण्यासाठी पवार कुटुंबीय सरसावले, रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
-‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार
-Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?
-“फडणवीस मुख्यमंत्री होताच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र” माजी खासदाराचा गंभीर आरोप
-पुणे महानगर परिवहन महामंडळाचे खाजगीकरण तात्काळ थांबवा अन्यथा…; प्रमोद भानगिरेंचा इशारा