पुणे : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड्या घडत असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी १२ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस असतो. या दिवशी शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफल्ल पटेल आणि अन्य काही नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतली. यावरुन राज्याच्या राजकारण अनेक चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यावरुन अनेक चर्चा सुरु आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही २० ते २५ डिसेंबर या काळात पुण्यातील शिवाजीनगर भागात ‘भीमथडी जत्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यत आला. तेव्हा यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या.
‘कार्यकर्त्यांनी दोन्ही नेते एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली आहे. शेवटी पक्षासाठी कार्यकर्ता महत्वाचा असतो. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेणं ही राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना बरोबर आहेत, कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने राहिला तर महाराष्ट्रात पक्षाचा ताकद चांगली आहे. शेवटी अजितदादा आणि शरद पवार साहेबांनी काय निर्णय घ्यायचा हा दोन्ही पक्षांचा निर्णय आहे. दोघेही विचार करुन निर्णय घेतील, असं मला वाटतं. राष्ट्रवादीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, असे सुनंदा पवार म्हणाल्या आहेत.
गेल्या कितीतरी पिढ्या पवार कुटुंब हे एकत्र नांदत आहे. सामाजिक, व्यवसायिक गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरीही आम्ही सगळ्या सुख-दुख:त एकत्र असतो. शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं ही तादक एकाठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं तसंच मलाही वाटतं. पवार साहेब हे मोठ गूढ आहेत. गेल्या ६० वर्षे राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या पत्नीला समजत नाही आम्हाला काय समजणार, असं म्हणत सुनंदा पवार यांनी दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत शरद पवारांची काय भूमिका असू शकते यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी नगरसेवक बोलतोय, तू फक्त येस ऑर नो सांग’; पुण्यात धक्कादायक प्रकार
-Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?
-“फडणवीस मुख्यमंत्री होताच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र” माजी खासदाराचा गंभीर आरोप
-पुणे महानगर परिवहन महामंडळाचे खाजगीकरण तात्काळ थांबवा अन्यथा…; प्रमोद भानगिरेंचा इशारा
-पवार काका-पुतण्याच्या भेटीने चर्चेला उधाण, दोघे एकत्र येण्यावर बड्या नेत्याचं मोठं विधान