पुणे : राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावरुन विरोधकांनी अनेक टीका केल्या. तसेच सध्या परभणीमध्ये जातीय तणाव निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. या सर्व गोष्टींवर आज माजी खासदार अमर साबळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर टीका गंभीर आरोप केला आहे.’देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात जातीय तणाव निर्माण केला जातो. षडयंत्र रचलं जातं. हा आतापर्यंतचा इतिहास आहे.’ असं मत अमर साबळे यांनी व्यक्त केलं आहे. अमर साबळे यांनी भीमा कोरेगाव आणि कोपर्डी येथील उदाहरणे दिली आहे.
“महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. ते मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीस हे जेव्हा-जेव्हा मुख्यमंत्री झाले. तेव्हा महाराष्ट्रात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र केलं जातं, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने लक्षात ठेवावं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील भीमा कोरेगाव यासारखी घटना घडली होती”, असं अमर साबळे म्हणाले आहेत.
‘कोपर्डीमधील घटनेनंतर आंदोलने झाली होती. तेव्हाही जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. यावरून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर जातीय तणाव निर्माण केला जातो. असा इतिहास आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. महाराष्ट्रात शांतता नांदावी आणि जातीय तणाव निर्माण न होण्याच्या बाजूने महायुती सरकार असणार आहे’, असं अमर साबळे यांनी मत व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महानगर परिवहन महामंडळाचे खाजगीकरण तात्काळ थांबवा अन्यथा…; प्रमोद भानगिरेंचा इशारा
-पवार काका-पुतण्याच्या भेटीने चर्चेला उधाण, दोघे एकत्र येण्यावर बड्या नेत्याचं मोठं विधान
-…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड
-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
-भटक्या कुत्र्यांनी तब्बल १४ हजार पुणेकरांना घेतला चावा; पालिका प्रशासनावर नागिरकांची तीव्र नाराजी