पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या काही डेपोचे संपूर्णतः खाजगीकरण करण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला आहे. पीएमपीएमएलचे होणारे खाजगीकरण तात्काळ थांबवण्याबाबत पत्र पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तसेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले आहे.
‘या संदर्भात पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की,पीएमपीएमएल कर्मचारी हे संपूर्ण प्रशासनाच्या वेतनश्रेणीनुसार कार्यरत असून नियमानुसार पीएमपीएमएलचे स्वतःच्या मालकीच्या ६०% बसेस संख्या असून ४०% खाजगी ठेकेदारांना निविदा पद्धतीने बसेस संख्या उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र खाजगी ठेकेदारांच्या दबावामुळे पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या पूर्णतः कमी करून काही डेपोच्या संपूर्ण बसेसची संख्या ही खाजगी ठेकेदारांच्या अखत्यारित देण्यासंदर्भातील प्रस्ताव पीएमपीएमएल प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात पीएमपीएल प्रशासन तसेच पीएमपीएल बचाव समिती आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांची तात्काळ बैठक आयोजित करून पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांची होणारी दिशाभूल तातडीने थांबवण्यात यावी’, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या खाजगीकरणाच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव असल्यास तो तातडीने रद्द करण्यात यावा, शिवसेना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या तसेच मराठी माणसांच्या सदैव पाठीशी उभी राहिली असून संपूर्णतः काही डेपोंच्या बसेसची संख्या ही खाजगी कंपन्यांच्या ठेकेदाराकडे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जाऊ देणार नाही. यासंदर्भात येत्या ८ दिवसांत तातडीने महानगरपालिका प्रशासन तसेच पीएमपीएमएल प्रशासनाने बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल’, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पवार काका-पुतण्याच्या भेटीने चर्चेला उधाण, दोघे एकत्र येण्यावर बड्या नेत्याचं मोठं विधान
-…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड
-महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट
-भटक्या कुत्र्यांनी तब्बल १४ हजार पुणेकरांना घेतला चावा; पालिका प्रशासनावर नागिरकांची तीव्र नाराजी
-‘वेळ पडल्यास स्वबळावर लढणार’; शरद पवारांच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण