Eye Care Tips : डोळे हे मानवी शरीराचे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. डोळे केवळ दृष्टी नाहीत तर आपल्या जीवनातील विविध दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. आजच्या काळात डोळ्यांचे अनेक विकार वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्क्रीनवरील काम आणि स्मार्टफोनचा अतिवापर यामुळे डोळ्यांचे आरोग्य अधिक धोक्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे डोळ्यांना होणारा ताण आणि त्याचे परिणाम लक्षात घेत डोळ्यांचे आरोग्य राखणे आजच्या काळात दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण डोळे हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समवेश केला पाहिजे? यायाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
– डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषणद्रव्यांचे महत्त्व खूप आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन A, C, E, झिंक, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि ल्यूटिन यांचा समावेश होतो.
– आपला शरीरात व्हिटॅमिन A कमतरता असल्यास डोळ्यांना अस्वस्थता जाणवते.
– ल्यूटिन आणि झेक्सेन्थिन हे डोळ्यांचे नुकसानकारक लाइटपासून संरक्षण करतात. हे घटक पालक, मटार, आणि कांदा, लसूण यामधून मिळतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन आहारात या 7 गोष्टींचा वापर कराच
- गाजर : व्हिटॅमिन A चा मुख्य स्रोत गाजर आहे.गाजरामध्ये बीटा-कॅरोटिन असतो. जो व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होऊन डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. हा डोळ्यांच्या दृष्टीला उत्तम ठेवण्यास मदत करतो.
- हिरव्या पालेभाज्या : आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पालक, कोथिंबीर, मेथी आणि अन्य हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये ल्यूटिन आणि झेक्सेन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. जे डोळ्यांच्या रेटिना आणि लेंसचे संरक्षण करतात.
- चहा (ग्रीन टी) : ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे डोळ्यांना मुक्त रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवतात. तसेच डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरतात.
- अंडी : अंडी व्हिटॅमिन A+झेक्सॅन्थिन+ल्युटिन+झिंक पोषक असतात. आणी लुटिन,झेक्सँथिनचे उत्तम स्रोत आहेत, जे डोळ्यांना कॅटॅरॅक्ट आणि अन्य समस्यांपासून संरक्षण करतात.
- मासे : मासे अनेक माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असते. ओमेगा-३ तेलाचे प्रमाण जास्त असलेले मासे सर्वाधिक फायदा देतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिड दृष्टीचा विकास , रेटिनल आरोग्य आणि कोरड्या डोळ्यांना प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या माशांमध्ये हे समाविष्ट आहे. म्हणून मासे आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावेत.
- संत्री, मोसंबीसारखी फळे : व्हिटॅमिन C चे चांगले स्रोत असलेल्या संत्र्यांमुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखता येते आणि डोळ्यांच्या कॅटॅरॅक्टच्या धोक्यापासून बचाव करण्यास मदत होते.
- सुका मेवा : बदाम, अक्रोड आणि पिस्ता यामध्ये व्हिटॅमिन E चे प्रमाण अधिक असते. जे डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे. डोळ्यांतील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो.
वरील पदार्थांचा समावेश दैनंदिन आहारामध्ये सामावेश केल्यास अनेक फायदे होतील असते.
हे ही वाचाच-