Winter Skin Care: हिवाळ्यात थंडीमुळे हवा अधिक कोरडी होते. त्यामुळे त्वचेची नमी कमी होते. परिणामी आपली त्वचा कोरडी आणि काळवंडलेली दिसू लागते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात आपली त्वचा निरोगी, नितळ आणि ताजीतवाणी ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये बदल करावा लागतो. तसेच काही त्वचेची नमी वाढवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स् आज आपण पाहणार आहोत.
नाकामध्ये तेल लावा: नाकाला किंवा तोंडाला लावण्यासाठी नारळाचे तेल किंवा आलिव्ह ऑईल वापरणे हे आपल्या निरोगी त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे त्वचेला अधिक पोषण मिळेल.
गरम पाण्याचे स्नान टाळा: हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर गरम पाण्यामुळे त्वचा आणखी कोरडी होऊ शकते. त्यामुळे शक्य तितके थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ करणे त्वचेसाठी उत्तम ठरते.
भरपूर पाणी प्या: हिवाळ्यात देखील तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. थंडीमुळे आपल्याकडून पाणी कमी प्यायले जाते त्यामुळे आपली त्वचा डिहायड्रेट होते. त्यामुळे सतत पाणी पिणे महत्वाचे आहे.
संतुलित आहार: हिवाळ्याच्या तुमच्या दैनंदिन आहारात ओमेगा-३ फॅटी आम्ल असणारी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. त्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळेल. त्वचा कोरडी किंवा काळपट पडणार नाही.
फळांचे सेवन: पाणीयुक्त फळे जसे की, संत्री, टरबूज, किवी यांसारख्या फळांचा रोजच्या आहारात समावेश असावा. त्यामुळे तुमच्या त्वचेला योग्य विटामिन्स मिळतात आणि त्वचा डिहायड्रेट होणार नाही.
व्यायाम, योगासने करा: नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला चांगली चमक येते.
फेस मास्क करा: हिवाळ्यात हाइड्रेटिंग फेस मास्क वापरा. यासाठी अवोकाडो, मध, आणि योगर्ट यांचा वापर करण्यास हरकत नाही.
मॉइश्चरायझर वापरा: हिवाळ्यात चांगले आणि जाड मॉइश्चरायझर वापरणे महत्त्वाचे आहे. हायालोरॉनिक ऍसिड, ग्लिसरीन, किंवा कोको बटर यासारखे घटक असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर हिवाळ्यामध्ये करणं महत्वाचं आहे.
सनस्क्रीन वापरा: हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे अनेकजण जास्त उन्हामध्ये असतात. अशाने सुर्यकिरण थेट त्वचेवर परिणाम करतात. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि काळपट पडते. त्यासाठी सुर्यकिरण थेट त्वचेवर पडण्याआधी चेहऱ्यावर आणि हाताला पायांना सनस्क्रीन लावा.
- या सर्व टिप्स फॉलो करुन तुम्ही हिवाळ्यातही आपली त्वचा नितळ आणि निरोगी ठेवू शकता.
हे ही वाचा-
-Benefits of soaked dates : आरोग्यासाठी खजूर वरदान! जाणून घ्या ‘हे’ चमत्कारीक फायदे