पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी अपहरण करुन हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात आढळला. या प्रकरणी पोलिसांची पथकं तपास करत असून वाघ यांचे अपहरण करणाऱ्या मंगळवारी रात्री पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशा दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या गाडीत सतीश वाघ यांचे अपहरण केले होते, त्या गाडीत आणखी २ जण होते. आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केला आणि नंतर त्यांचा मृतदेह हा शिंदवणे घाटात फेकून दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत चौघांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ खून प्रकरणातील कारवाई आणि तपास हा प्रगती पथावर आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली सुरु आहे. तसेच सतीश वाघ हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची एकूण १६ पथक रवाना करण्यात आले आहेत. हत्येचे कारण अद्याप समोर आलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड
-माय-लेकराच्या नात्याला काळिमा; थंडीच्या कडाक्यात नवजात बाळाला तोंडाला पिशवी बांधून रस्त्यावर फेकलं
-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: पिंपरी-चिंचवडमधील लाखो ‘लाडक्या बहिणीं’चे अर्ज बाद
-‘शिवसेनेच्या वटवृक्षाला लागलेली बांडगुळे हटवा’ शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी, ‘तो’ नेता कोण?