पुणे : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण पुणे शहराचे लक्ष कसबा विधानसभा मतदारसंघावर होते. या निवडणुकीत अतिशय दैदिप्यमान असा विजय हेमंत रासने यांनी मिळवला आहे. या विजयानंतर रासने यांनी मतदारांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हेमंत रासने यांनी मतदारसंघात सर्व मतदारांना पेढ्याचे वाटप केले असून एक पत्रकाच्या माध्यमातून मतदारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रासने यांची आभार व्यक्त करण्याची ही शैली मतदारांना चांगलीच भावली असून मतदारांकडून रासने यांचे कौतुक केले जात आहे. निवडून आल्यानंतर अनेकदा नेते मंडळी संपर्कात राहत नाहीत, असे दिसून येते मात्र आपल्या कृतीतून रासने यांनी खऱ्या अर्थाने ते जनतेचे आमदार असल्याचे दाखवून दिले असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
हेमंत रासने यांनी आमदार होताच मतदारसंघात त्यांनी कामाचा धडाका लावला. हेमंत रासने हे निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर थांबले नसून दुसऱ्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली आहे. कचरामुक्त कसबा करण्याचा त्यांनी संकल्प केला असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि जनतेला सोबत घेत हे एकप्रकारे अभियानच त्यांनी सुरु केले आहे. याशिवाय मतदारसंघातील अनेक नागरिकांच्या ट्राफिक मुक्त कसबा करण्यासाठी तसेच पाण्याच्या बाबतीत असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या ६ महिन्यात कसब्यातील नागरिकांना येणाऱ्या सर्व प्राथमिक अडचणी सोडवण्यावर रासने हे भर देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीवर जनतेने विश्वास दर्शविला असून कसबा विधानसभा मतदारसंघातील जनतेने सर्वाधिक ९० हजार मते मला दिली. हा जो आशीर्वाद मला जनतेने दिला आहे त्यासाठी मतदारांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. मतदारराजाने दिलेली जबाबदारी आणि माझ्याकडून असणाऱ्या जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. कसबा मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, कचऱ्याची समस्या दूर करून स्वच्छ कसबा करण्यासाठी मी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करेन. ट्राफिक मुक्त कसबा करण्यासाठी देखील आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहोत, असे हेमंत रासने म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी पुण्यात पाणीबाणी, कोणत्या भागात कपात?
-भाजप आमदार टिळेकरांच्या मामाचे सकाळी अपहरण, संध्याकाळी सापडला मृतदेह; हत्येचं नेमकं कारण काय?
-मावळच्या तरुणांकडून महायुती सरकारला विशेष शुभेच्छा; आकाशात झळकवले बॅनर
-हडपसरमधून आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; नेमकं काय प्रकरण?
-‘…तेव्हा कसं गारगार वाटायचं अन् आता…; पहिल्याच भाषणात अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार