पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण झाले होते. याबाबत आता धक्कादायक माहिती मिळत आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करुन त्यांचा हत्या करण्यात आला आहे. त्यानंतर सतीश वाघ यांचा शोध सुरु होता. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉर्निंग वॉकच्या वेळी ४ ते ५ जणांनी एका चारचाकी गाडीतून सतीश वाघ यांचे अपहरण केले होते. सायंकाळी शिंदवणे घाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली आहे.
तसेच संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना एक मृतदेह आढळला. त्यांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आढळलेला मृतदेह हा आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचाच असल्याचे समोर आले. मृतदेहाच्या अंगावर शस्त्राने वार केल्याचे निशाण आढळले आहेत. पाठीवर आणि मानेवर जखमा असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे शहर पोलिसांची पथके शिंदवणे घाटात पोहचली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून सतीश वाघ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठण्यात आला. विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली त्यानंतर आता आमदाराच्या मामाचे अपहरण करून हत्या झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळच्या तरुणांकडून महायुती सरकारला विशेष शुभेच्छा; आकाशात झळकवले बॅनर
-हडपसरमधून आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; नेमकं काय प्रकरण?
-‘…तेव्हा कसं गारगार वाटायचं अन् आता…; पहिल्याच भाषणात अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार
-‘मी पुण्याचाच, यावर शिक्कामोर्तब’; चंद्रकात पाटलांचं टीकाकारांना प्रत्युत्तर
-बावधनमध्ये खासगी स्टुडिओला भीषण आग; आगीवर नियंत्रण पण स्टुडिओ जळून खाक