पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आणि मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. मावळातील तरुणांनी महायुती सरकारच्या स्थापनेचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ९ डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेने महायुतीच्या सरकारला तरुणाईची कल्पकता दाखवून दिली आहे. पॅराग्लायडिंगद्वारे अभिनंदन करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले.
या उपक्रमात पंकज गुगळे, प्रवीण शिंदे, भाऊ गायकवाड, बाळासाहेब कुडले, गणेश शिंदे, गणपत नेवाळे, विकास शेलार, सनी कोळेकर, योगेंद्र भुल, दत्ता कोंढरे हे तरुण मोठ्या उत्सहाने सहभागी झाले होते. मावळमधील या आगळ्या उपक्रमामुळे तालुक्यात एक नवा उत्साह भरल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हडपसरमधून आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचे अपहरण; नेमकं काय प्रकरण?
-‘…तेव्हा कसं गारगार वाटायचं अन् आता…; पहिल्याच भाषणात अजित पवारांनी घेतला विरोधकांचा समाचार
-‘मी पुण्याचाच, यावर शिक्कामोर्तब’; चंद्रकात पाटलांचं टीकाकारांना प्रत्युत्तर
-बावधनमध्ये खासगी स्टुडिओला भीषण आग; आगीवर नियंत्रण पण स्टुडिओ जळून खाक