पुणे : विधानसभा निवडणूक २०१९मध्ये कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर बाहेरचा अशी टीका झाली. यावरुन विरोधकांनी त्यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केली. मात्र तरीही चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड निवडणुकीमध्ये विजय मिळवलाच. आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळविला होता. बाहेरुन आलेले या टीकेवरुन आता राज्याचे माजी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. पुणे पुस्तक महोत्सवासंदर्भातील व्यापक नियोजन बैठकीवेळी त्यांनी या टीकेला उत्तर दिले आहे.
“मी १९८२ पासून पुण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत पुण्यातून मला उमेदवारी मिळाली. तेव्हा ‘बाहेरून आलो’ अशी टीका माझ्यावर झाली. त्या परिस्थितीमध्ये मी शांत राहिलो. प्रामाणिक काम केले. त्यामुळेच मी राज्यात सहाव्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झालो. त्यावरून मी पुणेकर असल्याचे स्पष्ट झाले आहे”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टीकाकारांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचनाने माणूस समृद्ध होतो. वाचन माणसाला विचार करायला शिकवते आणि योग्य अयोग्यतेची जाणीव करून देते. याच भावनेतून पुण्यातील साहित्यिक आणि वाचन प्रेमींसाठी येत्या १४ ते २२ डिसेंबर दरम्यान पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी आज… pic.twitter.com/xWabqGns9Z
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 8, 2024
‘गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पुण्यातून उमेदवारी मिळाली तेव्हा माझ्यावर ‘बाहेरचा’ अशी टीका झाली. मात्र, मी शांत राहून काम केले. या निवडणुकीत मी राज्यातील सहाव्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी झालाे. त्यामुळे मी पुणेकर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे,’ अशा शब्दांत आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावरील झालेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बावधनमध्ये खासगी स्टुडिओला भीषण आग; आगीवर नियंत्रण पण स्टुडिओ जळून खाक
-पुणे पुन्हा गारठणार! येत्या ५ दिवसात तापमानाचा पारा घसरणार
-बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, चंद्रकांत पाटलांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना