पुणे : राज्यात मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असं म्हणावणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले अन् राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर फडणवीसांच्या पुन्हा येईन वाक्याची राजकीय वर्तुळासह सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली. अशातच आता सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनामध्येही यावरुन हशा पिकल्याचे पहायला मिळाले.
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. यावेळी राहुल नार्वेकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं. तसंच राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही ते पुन्हा आले असं देवेंद्र फडणवीस म्हणताच सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पहायला मिळाला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आज विरोधी पक्षाचेही आभार मानतो की राहुल नार्वेकर यांच्या निवडीला पूर्ण समर्थन दिलं. विरोधी पक्षातल्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे मी आभार मानतो. आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम राहिली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसंच ते पुढे म्हणाले, “अध्यक्ष महोदय आपण मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं तरीही आपण परत आलात याचा मला आनंद आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की राज्यात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री होते तेव्हा त्या तिघांमधला एक वकील होता. आता तुमच्या रुपाने आणखी वकील विधानसभेत आहे. राहुल नार्वेकर हे पहिलेच अध्यक्ष असतील पहिल्याच टर्ममध्ये ते अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष झाले. नाना पटोलेंचे विशेष आभार कारण त्यांनी वाट मोकळी केल्याने ते अध्यक्ष झाले”, असं म्हणत फडणवीसांनी नार्वेकरांचं कौतुक करतानाच नाना पटोलेंना खोचक टोलाही लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पुन्हा गारठणार! येत्या ५ दिवसात तापमानाचा पारा घसरणार
-बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, चंद्रकांत पाटलांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना
-‘पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद हवंच’; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
-पुण्याचा पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आपल्या सगळ्याच इच्छा पुर्ण होत नाहीत’
-‘लाडकी बहीण योजनेचे २१०० नाही तर ३ हजार रुपये द्या’; सुप्रिया सुळेंची मागणी