पुणे : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची तर २ उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. आता राज्याच्या मंत्रिमंंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी अनेक आमदारांचं जोरदार लॉबिंग सुरु आहे. अशातच पिंपरी चिंचवड भाजपने दबाव आणायला सुरवात केल्याचं पहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळावं यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट विधानसभेचा लेखाजोखा मांडला आहे. त्याचबरोबर आजवर शहराला न मिळालेलं मंत्रिपद यंदा मिळायला हवंच, अशी आग्रही भूमिका शहर भाजपने घेतली आहे.
राज्यातील २८५ मतदारसंघाच्या तुलनेत पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत आम्ही बूथ लेव्हल वर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडला आहे. ही कामगिरी पाहता शंकर जगताप आणि महेश लांडगे या दोघांपैकी एकाला मंत्रिपद द्यायला हवं, अशी मागणी शहर भाजपकडून करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी ३ विधानसभा मतदारसंघ असून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना चिंचवडमधून ७६ हजारांची तर पिंपरीमधून १६ हजार मताची आघाडी मिळाली होती. भोसरीमधून ९ हजार मतांच्या आघाडी मिळवून दिली. शंकर जगताप हे अध्यक्ष झाल्यानंतरही स्मूथ लेवल, बुथ स्तरापर्यंत शक्ति केंद्र मंडळ, आणि संघटनात्मक जी ताकद वाढली ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून आली. भाजपने तिन्हीही आमदारांना नियोजन करुन वियजी केलं. शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या नियोजनामुळे तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला एक भाजपचा श्रेष्ठी द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याचा पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आपल्या सगळ्याच इच्छा पुर्ण होत नाहीत’
-‘लाडकी बहीण योजनेचे २१०० नाही तर ३ हजार रुपये द्या’; सुप्रिया सुळेंची मागणी
-पुणे महापालिकेने नागरिकांच्या दारात वाजविला बँड; ४ दिवसात कोट्यावधींची वसूली
-मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा असाही रेकॉर्ड, तब्बल ४१९ कोटींची केली वैद्यकीय मदत
-मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील रुग्णाला केली ५ लाखांची मदत