पुणे : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आली. महायुतीच्या या यशामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लाडकी बहीण योजनेची रक्कम आता १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये करणार असल्याचा शब्द महायुतीच्या नेत्यांनी दिला आहे. तसेच गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खुद्द राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील “लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. तसंच २१०० रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात आम्ही त्याचा विचार आम्ही करु,” असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
“आता नवीन वर्ष सुरु होत आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासूनच लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये द्यायला सुरूवात करा”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना लाडक्या बहीण योजनेचे पैसे देण्यास सांगितले आहे. तसेच आता महिलांना २१०० नाही तर ३ हजार रुपये द्यावेत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला २१००रुपये देणार आहोत. मात्र, आमची मागणी आहे की आता नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे आतापासूनच म्हणजे डिसेंबर महिन्यापासून महिलांना नवीन रक्कम म्हणजेच २१०० रुपये द्यायला सुरूवात करावी. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. त्यामुळे शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा १ जानेवारी २०२५ पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना २१००रुपये जमा करा. आमची मागणी तर ३ हजार रुपयांचीच आहे. कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर लाडक्या बहिणींना महिना ३ हजार रुपये देणार होतो” असं त्या यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापालिकेने नागरिकांच्या दारात वाजविला बँड; ४ दिवसात कोट्यावधींची वसूली
-मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा असाही रेकॉर्ड, तब्बल ४१९ कोटींची केली वैद्यकीय मदत
-मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील रुग्णाला केली ५ लाखांची मदत
-एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?; केसरकर म्हणाले, ‘ते मोदी-शहांचं…’