पुणे : पुणे महानगरपालिकेने मिळकत कर न भरणाऱ्यांविरोधात कारावाईचा बडगा उगारला आहे. पालिकेचा मिळकत कर न भरणाऱ्या तसेच थकबाकी असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून आता ही थकबाकी वसुल करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतदारांना नोटीसा देऊन त्यांच्याकडून वसुली करण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.
पुणे पालिकेकडून ही थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष बँड पथक तयार करण्यात आले असून या माध्यमातून ४ दिवसांत ११ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. तसेच यापुढे देखील ही मोहीम सुरू राहणार आहे. मिळकतकर विभागाकडे आतापर्यंत शहरातील ८ लाख ७३ हजार २५७ मिळकतदारांनी १ हजार ८०० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागाला २ हजार ७०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ८०० कोटी रुपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पालिका हद्दीतून वगळून तेथे नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, या गावातून मिळकत कर वसूल न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे या गावातून मिळणरे २५० ते ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होणार आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील रुग्णाला केली ५ लाखांची मदत
-एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?; केसरकर म्हणाले, ‘ते मोदी-शहांचं…’