पुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईमध्ये शपथ घेतली. मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील एका रुग्णाला ५ लाख रुपयांची वैद्यकीय सहायता निधीमधून मदत करण्यासाठी पहिली सही केली. मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून केल्या जाणाऱ्या या मदतीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेकॉर्ड मोडला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे राज्यातील नागरिकांना तब्बल ४१९ कोटींहून अधिक अर्थिक मदत केली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून रूग्णांच्या मदतीसाठी ३८१ कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरित तर नैसर्गिक आपत्ती साठी ३८ कोटींहून अधिक अर्थसहाय्य करण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील शहीद ११३ मराठा बांधवाच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लक्ष रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता कक्ष हा राज्यातील गोरगरीब -गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे देखील यासाठी खूप मोठे योगदान राहिले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा आलेख कायम चढता राहिला आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या २ वर्षं ६ महिन्यात एकूण ३८१ कोटीहून अधिक रुपये अर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. यामुळे तब्बल ५१ हजारांपेक्षा अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत (empanel ) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असून ऑनलाईन अर्ज करुनही हा निधी मिळवता येतो.
मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थिक मदत मिळवण्यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा, आणि स्वतः अर्ज करा. रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः थेट अर्ज करता येतो.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील रुग्णाला केली ५ लाखांची मदत
-एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?; केसरकर म्हणाले, ‘ते मोदी-शहांचं…’
-…म्हणून प्रशांत जगतापांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले १२ लाख ७४ हजार