पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप महायुतीकडून मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून आपापल्या नेत्याचे नाव पुढे केलं जात आहे. अशातच भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची देखील समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चेला आता मुरलीधर मोहोळ यांनीच पूर्णविराम दिला आहे.
‘समाज माध्यमांमधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची होणारी चर्चा निरर्थक आणि कपोकल्पित आहे’, असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्रीपदासाठीची खोडून काढत स्पष्टीकरण दिले आहे.
समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे.
आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 29, 2024
“आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे. आमच्या भाजपमध्ये पक्षशिस्त आणि पक्षाचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लमेंटरी बोर्डात एकमताने घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर आणि पार्लमेंटरी बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पक्षाचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा ही अर्थहीन आहे”, असे खुलासा मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘कोणत्याही पदाची जबाबदारी दिली तरी…’; सुनील शेळकेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
-पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या विजयी आमदारांची चंद्रकांत पाटलांनी घेतली सदिच्छा भेट
-‘गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह’; डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण
-राज्यात ‘या’ दिवशी होणार सत्तास्थापन! महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!