पुणे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. मात्र, याउलट महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्याचे पहायला मिळाले आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुण्यातही काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी पहायला मिळाली असून याचा पक्षाला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतरही काँग्रेसमधील गटबाजी काही संपली नसल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यातील काँग्रेसभवन येथे वाद पहायला मिळाला आहे.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून मनीष आनंद यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती. यावेळी पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा मनीष आनंद यांच्यावरही कारवाई करण्यात आली असून त्यांना पदमुक्त करण्यात आल्यानंतर या ठिकाणी प्रभारी महिला अध्यक्ष म्हणून संगीता तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिवारींच्या नियुक्तीनंतर काँग्रेसभवनातील महिला अध्यक्षांचं कार्यालय शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाला देण्यात आलं. त्यामुळे सध्या महिला शहर अध्यक्षांकडे कोणतेही कार्यालय राहिलेले नाही. यावरुन आता संगीता तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली.
“पुणे शहर महिला काँग्रेसचे कार्यालय ऐन निवडणुकीमध्ये सुजित यादव यांनी घेतलं आणि आम्हा महिला काँग्रेसला बाहेर केलं. त्याबद्दल सुजित यादव यांचे हार्दिक अभिनंदन… आपल्या महिला सन्मानाला खरंच आमचा सलाम. अशी महिला सन्मान करणारी लोक जर काँग्रेसमध्ये असतील तर खरंच काँग्रेस खूप पुढे जाईल. असे भविष्य आम्हा महिला भगिनींना दिसत आहे. याबाबत पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही”, असे संगीता तिवारी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्याचे पालकमंत्री अजितदादाच’; कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्रिपद माळ?
-पोर्शे कार प्रकरण: अपघात प्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर
-‘देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत’; हेमंत रासनेंनी व्यक्त केली इच्छा
-“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार
-‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप