पुणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. पुण्यातील कसबा पेठ निवडणुकीचा निकाल हा राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिला. भाजपच्या हेमंत रासने यांनी १९,४२३ इतकं मताधिक्य घेत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाची धूळ चारली आहे. भाजपचे नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हे ९०,०९४ मतांनी निवडून आले आहेत.
कसब्याचे आमदार होताच हेमंत रासने हे मतदारसंघात चांगलेच अॅक्टीव्ह झाल्याचे पहायला मिळाले. रासने यांनी आज पुणे महापालिकेतील अधिकारी वर्गांसोबत मतदारसंघातील पाहणी दौरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महायुतीमधील प्रमुख नेतेमंडळी मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, पण मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हीच इच्छा आहे’, असे हेमंत रासने म्हणाले आहेत. तसेच मतदारसंघ ‘कचरामुक्त’ करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलत असल्याचे रासनेंनी सांगितले आहे.
‘विधानसभा निवडणुकी दरम्यान जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार कचरा मुक्त कसबा ही मोहीम हाती घेण्यात आली असून आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदार संघातील अनेक भागात अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत आणि ते ८ दिवसात अहवाल देतील. त्यानंतर आमची पुन्हा एकदा बैठक झाल्यावर कसबा मतदारसंघ कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाणार आहोत. या उपक्रमात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावेत. या उपक्रमासाठी काही सूचना कराव्यात, असे आवाहन रासनेंनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“शिदेंना राजकारणातलं जास्त कळत असेल तर फडणवीसांना बाजूला करुन त्यांनाच मुख्यमंत्री करा”- रोहित पवार
-‘गुजरातच्या ईव्हीएममुळे माझ्या मतदारसंघात ५० हजार मतांचा घोळ’; प्रशांत जगतापांचा गंभीर आरोप
-निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात
-भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?