पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला बहुमत मिळालं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार हे स्पष्ट केला. महायुतीच्या या विजयावरुन महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. अशाच प्रकारचा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे. प्रशांत जगताप यांनी फेसबुक पोस्ट करत हडपसरमध्ये मतदानात फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
“महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ज्या ईव्हीएम मशीन वापरण्यात आल्या. त्या गुजरातमधून आणण्यात आल्या होत्या. त्या मशीनमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी १५ टक्के मतदान हे इनबिल्ड होतं, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. यामुळे माझ्या मतदारसंघात ४० ते ५० हजार मतांचा घोळ झाला”, असा दावा आता प्रशांत जगताप यांनी केला आहे.
‘हडपसर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा पराभव झाला. मात्र एक सामान्य कुटुंबातील व्यक्तीला हडपसरच्या मतदारांनी एक लाख २७ हजार ६८८ मत मिळाली. फक्त ६,१२२ मतांनी माझा पराभव झाला. त्यामुळे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे आभार आणि ज्यांनी मला मतदान केले नाही. त्यांचे पण आभार! कारण लवकरच त्यांना आपण प्रशांत जगताप यांना मतदान केलं नाही, याचा पश्चाताप वाटेल’, असे प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
“राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभरामध्ये ८६ जागा लढल्या तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही १३ ते १४ जागा लढलो. मी हरलो असलो तरी या ८६ उमेदवारांमध्ये सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाची मतं मला मिळाली आहेत. मतदारसंघात तब्बल ९ हजारापेक्षा अधिक बोगस मतदान झाला आहे. त्या मतदान मुळेच माझा पराभव झाला आहे. ती माहिती मी माहितीच्या अधिकारात मागवली असून ती सर्वांपुढे मांडणार आहे.तसेच मतदान केंद्रामध्ये आम्हाला ६ ते ७ ईव्हीएमचे सील तुटलेलं भेटले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ७ हजार मतांची फेरफार झाल्याची देखील संशय आम्हाला आहे”, असाही गंभीर आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक संपताच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का; गायीच्या दुधात मोठी कपात
-भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?
-पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? या ४ आमदारांची नावे चर्चेत
-विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपची सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ